महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दिल्ली:- भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या मारहाणी करत पराजय करत मोठा विजय मिळवला. तेव्हा पासून दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू होती आज अखेर मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला असून आता दिल्लीला महिला मुख्यमंत्री भाजपा ने दिला आहे. रेखा गुप्ता या महिला नेत्यांच्या हाती दिल्लीची कमान देण्यात आली आहे.
आज दिल्लीला अखेर नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. दिल्लीतील भाजप आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता दिल्लीची कमान महिला सांभाळणार आहे. नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रवेश शर्मा यांचं नाव उपमुखमंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे. तर आता रेखा गुप्ता आता 20 फेब्रवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
रेखा गुप्ता या पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत विजयी झाल्या आहे. त्या शालीमार बाग विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहे. त्यांनी आम आदमी पार्टीच्या उम्मीदवार वंदना कुमारी यांचा 29,595 मतदानाने पराभव केला आहे.

