अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सामाजिक क्षेत्रात स्वतःला समर्पित करून निस्वार्थ, संघर्षमय व बिकट परिस्थितीतून समाजात वैचारिक क्रांती व समाज संघटित करून समाजाच्या सर्वोपरी विकासासाठी मोलाचे योगदान देत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवत स्व.अण्णाजी कुबिटकर केळवद यांनी आपले जीवन जनसामान्यासाठी समर्पित केले होते.समाजाप्रति असणाऱ्या एका सामान्य माणसाचे नैतिक कर्तव्य व जबाबदाऱ्या याची जाण असणारे व येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादाई कर्तृत्वाचे आदर्श व विचार याचा वारसा देऊन गेले.
स्व.अण्णाजी कुबिटकर यांच्या असामान्य समाज कार्याची दखल घेऊन शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मुंबई महाराष्ट्र यांच्या शासन निर्णयानुसार सावनेर येथील शासकीय आयटीआय याचे नामांतर करून स्व.अण्णाजी कुबिटकर शासकीय आयटीआय सावनेर सुचित केले होते. या निमित्ताने याचा नामांतरन सोहळा दिनांक १८ फेब्रुवारीला पार पडला.
नामांतरन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. आशिष देशमुख यांनी केले तसेच अध्यक्षस्थान डॉ. राजीव पोतदार यांनी भूषवले. निमंत्रित मान्यवरांमध्ये प्रमुख वक्ते श्रीधर गाडगे, विशेष उपस्थिती उद्धव कुबीटकर, ताराचंद गांधी, प्रमुख पाहुणे मनोहर कुंभारे, अशोक धोटे, अँड अरविंद लोधी, संजय भोंगे, प्रेमचंद पाटील, रामराव मोवाडे, मंदार मंगळे, राजु घुगल, किशोर धुंडेले आणि संपूर्ण कुबिटकर कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन श्री लोही यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी.बी. नंदुरकर यांनी केले. आभार श्री. भुरे यांनी मानले. यावेळी आपल्या उदघाटनीय भाषणात आशिष देशमुख यांनी येण्याऱ्या काळात देशात व विदेशात इंडस्ट्रीला लागणारे मनुष्यबळ व त्यासाठी कौशल्य विभागाचे महत्व आधोरेखित केले. राजीव पोतदार यांनी स्व. अण्णाजी कुबिटकर यांच्या सामाजिक जीवनातील संघर्ष व परिश्रम याचा सखोल उलगडा केला. त्यांचे पुत्र उद्धव कुबिटकर यांनी त्यांच्या जीवनातील आठवणीचा उजाळा केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे प्राचार्य पी. बी. नंदुरकर, एन.एन.भोयर (गटनिदेशक) तसेच शिल्पनिदेशक पोतदार मॅडम, आकोटकर मॅडम, रंगारी मॅडम, उईके मॅडम, कटरे सर, रांगनकर सर, काकडे सर, राठोड मॅडम, सुरजुसे सर, मालेकर सर, पुसाम सर, बालाजी सर, सोनटक्के सर शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक व प्रशिक्षणार्थी यांनी सहकार्य केल.

