🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट:- येथील नगर पालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 येथील गंभीर समस्यांची दखल घेऊन त्या त्वरीत सोडविण्यात याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे, शहरप्रमुख अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज कुबडे यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांना एका निवेदनातून दिलेला आहे.
या निवेदनातून दिलेल्या वृत्तानुसार, या प्रभागातील कुबडे ले-आउट येथे एक लांबलचक खड्डा पडलेला असून पावसाळ्यात या खोल खड्यात पाणी साचत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. तरी हा जीवघेणा खड्डा त्वरित बुजविण्यात यावा. लोंढेकर ले-आऊट येथे विधुत खांबावर लावण्याकरिता त्वरित पथदिवे उपलब्ध करून या भागातील जनतेला रात्रीच्या वेळी अंधारातून बाहेर काढावे. संपूर्ण प्रभागात आठवड्यातुन एकदा फवारणी करण्यात यावी तसेच गटरचे कनेक्शन जोडून दिल्यास सांडपाणी सुरळीतरित्या नाल्यात जाऊ शकेल, नपच्या नळद्वारे दूषित पाणी पुरवठा बंद करून प्रभागातील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरविण्याची व्यवस्था करण्यात यावी.यापूर्वी नप प्रशासनाकडे अनेकदा अर्ज विनंती करण्यात आली परंतु त्याचा कोणताही उपयोग नागरिकांना झालेला नाही.या गंभीर प्रश्न कडे वेळीच लक्ष न दिल्याने प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.
या बाबतचे निवेदन प्रहारचे विदर्भ प्रमुख गजुभाऊ कुबडे,शहर प्रमुख अतुल जाधव,यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवक सूरज कुबडे यांच्या नेतृत्वात नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहारचे कार्यकर्ता अजय लढी, सतीश गलांडे, अजय ठाकरे, संदीप प्रजापती, प्रवीण चरडे, हेमंत घोडे, अर्चना माकोडे, धीरज नन्दरे, अमोल वाघमारे, अमोल बावणे, पवन वाघमारे , अमोल रामगुंडे, मोहन पेरकुंडे, बालू खेकडे, दिनकर कुबडे, समीर मानकर, अर्चना माकोडे, विद्या कावळे, आशु चरडे, सुरेखा कुबडे, प्रवीण दरवेकर, उमेश दांडेकर, समीर कुबडे, संकेत सातपुते, संकेत कावळे, धनंजय मोहर्ले व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.