दलीत समाजाने हजारोच्या संख्येने एकत्र येत पुकारला जातीवादी गावकऱ्या विरोधात एल्गार.
प्रशांत जगताप, प्रतिनिधी
कर्नाटक:- एकाच रक्त मासाच्या असलेल्या मनुष्याने मंदिराला हात लावला तर देव बाटतो? काय माणसाने देशात जातीवादी शैतान दिवसा ढवळ्या माणुसकी नासवत आहे. जातीवाचा आतंक एक दिवस या भारत देशाला अंधकारमय खाईत घेऊन जाणार असे तरी चित्र मागील काही दिवसा पासून घडणाऱ्या घटना वरून समोर येते आहे. अशीच एक संतापजनक घटना कर्नाटक राज्यातील समोर कोलार जिल्हातून समोर आली आहे.
एका दलीत समाजाच्या 10 व्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलगा मंदिरात गेला म्हणून गावातील पंचायतने त्या दलित समाजाच्या कुटुंबावर 60 हजार रुपये भरण्याचा दंड लावला. त्या मुलाची चूक हेच होती की तो गावातील ग्राम देवतेच्या मंदिरात जाऊन मंदिराच्या खांबाला त्याने हात लावला. त्यामुळे गावातील नाराज जातीवादी लोकांनी मिळून त्या दलीत कुटुंबावर अशा प्रकारे दंड लावला होता. ही घटना कोलार जील्हातील उलरहल्ली गांवातील आहे.
प्राप्त माहितनुसार, उलरहल्ली या गावात वोक्कालिगा समाजाचे मोठे वर्चस्व आहे. या गावात दलित समुदायाची फक्त 8-10 कुटुंब राहाते. 8 सप्टेंबर ला गावात आयोजित गाव देवता भूतयम्मा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी याच गावात राहणारे शोबा आणि रमेश याचा 15 वर्षाचा मुलगा मंदिर गेला, त्याने ग्राम देवतेच्या सिदिराना याला जोडून असलेले एक खांभाला हात लावला होता हे गावातील एका इसमाने बघितल आणि मंदिर बाटवल अस सर्वांना सागितलं.
हे प्रकरण समोर येतात राज्यातील दलीत समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. एका दलीत कुटुंबावर अशा प्रकारे जातीवादी पंचायत ने दंड लावला त्यामुळे हजारो दलीत पेटून उठले आणि जातीवादी पंचायतने ज्या मंदिरतील देव बाटवल्या बदल दलीत कुटुंबाला शिक्षा दिली त्या मंदिरावर निळा ध्वज फडकावून आपला निषेध नोंदविला.
अशा जातीवादी मानसिकतेतून आज मोठ्या प्रमाणात दलीत समाज अन्याय अत्याचार सहन करत आहे. पण कर्नाटक राज्यात यांच्या एकते मुळे आज उलरहल्ली गावात आणि जिल्हात मोठ्या प्रमाणात बदलाव दिसून येत आहे. दलीत परिवार आपल्या न्याय हक्क अधिकार यासाठी लढत आहे.
