अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात हराळे मराठी चर्मकार समाजाचा परिचय मेळावा दि.१६ फेब्रुवारी रोजी स्थानीक कंवरराम भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. शंकर गुजरकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्टार महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार निलेश पिंजरकर, कोरा येथील सरपंच प्रविण पंचवटे, डॉ. राहुल मेटकर, प्रा. विजय, शरद खोब्रागडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या विचार व जीवनपटावर मार्गदर्शन करण्यात आले. समाजाच्या उन्नतीसाठी संतांच्या विचारांचा अंगीकार करण्याची गरज व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी सर्वश्री शंकर मालखेडे, अशोक मेंढे, भानुदास पाटील, वसंत मानकर, सुरेश भोंगे, सचिन भागवते इत्यादी मान्यवरांचे अभिनंदन करीत सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजू राजू खांडस्कर व नीलिमा अशोक मेंढे यांनी केले तर ज्ञानेश्वर भागवते यांनी उपस्थितांचे आभार मानले. या समाज परिचय मेळाव्यात मराठी हराळे चर्मकार समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

