अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील श्री संत नगाजी महाराज देवस्थान पारडी (नगाजी) मूर्ती स्थापना रौप्य महोत्सव निमित्य भागवत कथा प्रवक्ते ह.भ.प. गुरुवर्य अनिल महाराज साखरे तसेच झी टॉकीज फ्रेम, पुणे ह.भ.प.कु. शिवलिलाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटक हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे संचालक प्रफुल बाडे, श्री संत नगाजी महाराज मंदिर वर्धाचे अध्यक्ष गणेश अतकरे, श्री संत नगाजी महाराज पारडीचे अध्यक्ष नरेंद्र मांडवकर, सचिव रामभाऊ भोयर व मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील सर्व मंडळी व बाहेर गावा वरून आलेली मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती..

