संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- बंजारा समाजाचे आद्यदैवत संत श्री सेवालाल महाराजयांच्या 286 व्या जयंती निमित्त राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी मंगी बुज येथील सेवालाल मंदिर येथे थोर समाज सुधारक संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगी येथे बंजारा समाजबांधवाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थितांना संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याचप्रसंगी मंगी वासीयांनी नागरी सत्कार केला.
यावेळी स्मार्ट ग्राम मंगी चे सरपंच शंकर तोडासे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय राठोड, गोर बंजारा समाजाचे नायक गुलाब चव्हाण, बुथप्रमुख बालु चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, ग्रामसेवक शितल नरनावरे, पोलीस पाटील व्यंकटेश मुंडे, मुख्याध्यापक ऋषी मेश्राम, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, सुधीर झाडे, सत्यपाल जाधव, मेरचंद चव्हाण, बापूजी चव्हाण, विनोद चव्हाण, परतुजी चव्हाण, नामदेव जाधव, सकरु राठोड, वसंता चव्हाण, प्रकाश चव्हाण, संगुजी जाधव, किसन पवार, रविंद्र जाधव, ताराचंद पवार, बालु चव्हाण, सुरेश चव्हाण, बाळकृष्ण चव्हाण, सुधाकर चव्हाण, मेरचंद पवार, हरिदास पवार, इंद्रपाल चव्हाण, अंबादास जाधव, दशरथ जाधव, कपिल राठोड, मधुकर चव्हाण, वासुदेव राठोड, संतोष आडे, नवनाथ जाधव, गोविंदा चव्हाण, नानाजी चव्हाण, रामभाऊ तलांडे, डॉ. काबीलाल सेन, प्रकाश वेडमे यांचेसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी सरपंच शंकर तोडासे यांनी आमदार देवराव भोगंळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. गावातील चालू असलेल्या विविध कामांविषयीची माहिती देवुन कामाचे निवेदन दिले. आमदार देवरावदादा भोंगळे यांनी गावातील विकासकामाबद्दल समाधान व्यक्त केले. भविष्यात आणखी चांगले कार्य करून आपल्या गावाचे नावलौकिक करा अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु वैष्णवी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश राठोड यांनी मानले.

