अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या ६४८ व्या जयंती निमित्य १६ फेब्रुवारीला सावनेर येथील राम गणेश गडकरी सभागृहात प्रबोधन व रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी जनकल्याण सामाजिक संघटना अध्यक्ष भगवान चांदेकर, बीपीएस संयोजक मयूर नागदवणे, गोपाल घटे माजी उपाध्यक्ष न.प. सावनेर, धर्मेंद्र सोनेकर, कृष्णाजी पहाडे, अँड.शैलेश जैन, योगेश सोनेकर, शिशुपाल कनोजे, ललिता कनोजे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सावनेर येथे रविदास महाराज सामाजिक सभागृहाची मागणी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या निधीतून मंजूर करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष मछले यांनी केले. संचालन राजेंद्र चवडे यांनी मानले तर आभार प्रदर्शन देवेंद्र छत्रे यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजनात रामकेवळ कनोजिया, अनुप पठाणे, नित्यानंद कोलते, मेश मछले, रमेश पहाडे, नरेश छत्रे, नरेश मछले, मंगलू बघेल, नरेश सोनबरसे, विकास छत्रे, खुशाल छत्रे, मोतीलाल कोलते, बालक पठाणे, उर्मिला पहाडे, रमाबाई वंजारी, ज्योति मछले, माया छत्रे, आशा पठाणे, ममता शेंडे, श्यामलता छत्रे, शोभा छत्रे, ममता शेंडे, गौराबाई मछले आदी लोकांनी महत्वपूर्ण कार्य केले. यावेळी सावनेर तालुक्यातील शेकडो बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

