उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हा त मागील काही दिवसांपासून अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यात मिरज पोलिसांनी एका गांजा तस्करावर कारवाई करत बेड्या ठोकल्या आहे. कोल्हापूर रस्त्यावर मिरजेच्या गांधी चौक पोलिसांनी अरबाज शफिक पटेल वय 40 वर्ष, रा. म्हैसाळ रोड, चाँद कॉलनी, मिरज या गांजा तस्कराला पकडून 42 हजार 500 रुपये किमतीचा एक किलो 700 ग्रॅम गांजा हस्तगत केला.
अवैध्य गांजा तस्करी करणारा अरबाज शफिक पटेल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्यांचा दुसरा साथीदार अल्ताफ ऊर्फ बाबा जमादार हा फरार झाला आहे. या आठवड्यातील गांधी चौक पोलिसांची ही गांजा तस्करीवर दुसरी कारवाई आहे.
मिरज येथील कोल्हापूर रस्त्यावर खतीब हॉलजवळ पुलाखाली एकजण गांजा विक्रीसाठी आल्याची गुप्त पोलिसांनी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी संशयित अरबाज पटेल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गांजा साठा हस्तगत केला. हा गांजा हा अल्ताफ ऊर्फ बाबा जमादार याच्याकडून आणून किरकोळ विक्री व वितरण करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
अरबाज याच्याकडून गांजा व दुचाकी, असा 92 हजार 510 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, अभिजित धनगर, अभिजित पाटील, नाना चंदनशिवे यांनी ही कारवाई केली.

