अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- राज्यात मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातून एक संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. रिद्धपूर येथील रेंद्रमुनी तळेगावकर या महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या दोन नराधमाने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील अनेक दिवसांपासून अत्याचार करून तिला 8 महिन्याची गर्भवती केल्याची घटना समोर आली आहे. सुरेंद्र मुनी व त्याचा साथीदार बाळकृष्ण देसाई असे या नराधम आरोपीची नावे असून या नराधमांनी गेल्या वर्षभरापासून या 17 वर्षीय मुलीवर लैंगिक शोषण केले आहे.
17 वर्षीय मुलगी 8 महिन्यांची गर्भवती: मठात अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्यामुळे 17 वर्षीय पिडीत मुलगी 8 महिन्यांची गर्भवती असल्याचं देखील समोर आले आहे. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून 2 नराधम आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या लैंगिक शोषणात सदर अल्पवयीन युवतीची मावशीने देखील आरोपींना सहकार्य केल्याची बाब समोर आली आहे.
मावशीने पीडितेला केलं नराधमाच्या हवाले: अल्पवयीन मुलगी ही 8 महिन्याची गर्भवती झाल्याने मठात सुरू असलेल्या अत्याचाराचे हे भिंग फुटलं. पीडित मुलगी ही तिच्या मावशीसोबत मठात राहात होती. पीडित मुलगी ही मठातील इतर मुलींसह, महिलांसोबत झोपली होती. तेव्हा रात्री 12 वाजताच्या दरम्यान तिच्या मावशीने या मुलीला झोपेतून उठवलं. नंतर ती तिला सुरेंद्र तळेगावकर यांच्या खोलीत घेऊन गेली. त्यानंतर सुरेंद्र तळेगावकर याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. यावेळी मुलीने विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.
अस आले प्रकरण समोर: पिडित मुलीने तिच्यावर सुरू असलेल्या अत्याचार बाबत मावशीला सांगितले. त्यानंतर मावशीने त्या पिढीत मुलीला कोणालाही काहीही सांगू नको, असं म्हणत मावशीने देखील मठातून बाहेर जाण्यापासून रोखलं. दोन्ही नराधमांनी पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केले. एक दिवस मुलगी गरोदर असल्याचं समजताच मावशीने तिला रुग्णालयात नेलं. तेव्हा पिडीत मुलीने डॉक्टरांना सर्व आपबिती सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने पोलिसांनी या घटनेची कल्पना दिली अन् मठातील बाबाविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
दरम्यान, शिरखेड पोलिसांनी पोस्कोचा गुन्हा दाखल करून आरोपी सुरेंद्रमुनी तळेगवावकर, बाळासाहेब देसाई आणि पीडितेच्या मावशीला अटक केली आहे.

