दिंडीत ग्रामस्थांचा मोठया प्रमाणात सहभाग, गावात भक्तीमय वातावरण.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- वंदनीय तुकडोजी महाराजांचा ५६ वा पुण्यतिथी सोहळा, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त श्री. गुरुदेव तत्वज्ञान व ग्रामगीता विचार मंथन प्रबोधन कार्यक्रम विशेष सत्कार सोहळा तथा तालुका कार्यकर्ता मेळावा पाचगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या पटांगणावर मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला. यावेळी सकाळी ५:३० वाजता सामुदायिक ध्यानाने सोहळ्याची सुरुवात झाली आणि ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सकाळी ८:०० वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पालखी काढण्यात आली. दिंडी काढण्यात आली त्यात खैरगुडा, अहेरी, भेंडाळा व पाचगाव येथील भजनाची भजन मंडळी होती. यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी लेझीम सहभागी झाले. गावातील मुख्य मार्गानी ही भव्य दिंडी निघाली. यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची वेशभूषा व संत गाडगेबाबा यांची वेशभूषा परिधान करून पालखी सोहळ्या सहभाग घेण्यात आला त्यामुळे नक्कीच सामाजिक संदेश देण्यावर भर होता. गावातील सर्व नागरिक मोठया संख्येनी उपस्थित राहुन मार्गातील प्रत्येक घरी दिंडीचे पुजन करुन स्वागत करीत होते. गावात एक भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर दुपारी २:०० वाजता श्री गुरुदेव तत्वज्ञान व ग्रामगीता विचारमंथन प्रबोधनात्मक कार्यक्रम व उत्कृष्ठ कार्य करणारे समाजसेवक डॉ. गिरीधर पा. काळे बिबी, स्मार्ट ग्राम मंगी (बु)चे सरपंच शंकर तोडासे, स्मार्ट ग्राम कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांचा शाल व श्रीफळ देवून विशेष सत्कार करण्यात आला तसेच गावातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी शिक्षक यांचाही शाल व श्रीफळ देवून नागरी सत्कार करण्यात आला. तथा तालुका कार्यकर्ता मेळावा पार पाडण्यात आला. उद्घाटनिय भाषणात प्रा. रूपलाल कावळे जिल्हा प्रचार प्रमुख अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी यांनी सामुदायिक ध्यान व शिस्त यावर गावकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनदास मेश्राम तालुका सेवा अधिकारी गुरुदेव सेवा मंडळ राजुरा यांनी अध्यक्षीय भाषणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आत्मसात करण्यावर भर दिला. पालखीत जाईल व ग्राममिगतेतून गावाचा नकाशा बदलेल यावर संबोधिले. सदर कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा च्या वतीने नृत्य सादरीकरण करण्यात आले.
त्यानंतर संध्याकाळी इंजिनियर उदयपाल महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंजिनियर उदयपाल महाराज यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सायंकाळी किर्तनाचा कार्यक्रमाला गावातील लोकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रा. रूपलाल कावळे जिल्हा प्रचार प्रमुख अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनदास मेश्राम तालुका सेवा अधिकारी गुरुदेव सेवा मंडळ राजुरा, तसेच सर्व तालुका कार्यकारणी गुरुदेव सेवा मंडळ राजुरा, सत्कारमूर्ती डॉक्टर गिरीधर पाटील काळे, नंदकिशोर वाढई अध्यक्ष जिल्हा सरपंच संघटना चंद्रपूर, शंकर तोडासे सरपंच स्मार्ट ग्रामपंचायत मंगी (बु), आबाजी पा. ढवस भेंडाळा, सुधाकर गेडेकर, प्रचार प्रमुख गुरुदेव सेवामंडळ, प्रकाश कोहपरे,अध्यक्ष तंटामुक्त समिती, शंकरराव गोनेलवार माजी सरपंच, हरी पाटील बोबडे माजी उपसरपंच, तिरुपती इंदूरवार संचालक बाजार समिती राजुरा, किसन पा. पिंपळकर, भास्करराव लाड, उध्दव चौधरी, सुनंदाताई डोंगे, पं.स.चे माजी सदस्य, बाबुरावजी मडावी पेसा कायदा तज्ञ तथा सदस्य ग्रा.पं., सत्यपाल चापले, अध्यक्ष शाळा व्यवस्थपन समिती, मालनताई पाल, महिला प्रमुख,लक्ष्मण नुलावर, संजय दुधे मुख्याध्यापक, जहीर खान विषय शिक्षक, रत्नाकर भेंडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सुधाकर कुळसंगे विषय शिक्षक, गजानन भेंडे, दशरथ भोयर, सुधाकर बावणे, आकाश नुलावर हे होते. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश गेडेकर गेडेकर, आभार प्रदर्शन गोपाल जंबुलवार यांनी केले. गावातील सर्व मंडळानी मोलाचे सहकार्य केले.

