सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694
बल्लारपूर:_वंचित बहुजन आघाडी तसेच महिला आघाडी बल्लारपूर द्वारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त सकाळी 9.30 वाजता जुनी नगरपरिषद परिसरातील राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर
सायंकाळी 7.00 वाजता जय भीम चौक विजयस्तंभा जवळ शिव जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम,तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा व मान्यवर नागरिकांचा सन्मानचिन्ह देऊन सम्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शब्दसुमनाने पाहुण्यांचे स्वागत करूत मंचावर निमंत्रित करण्यात आले सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर जय भीम चौकात असलेले भीमा कोरेगाव विजय स्तंभांच्या प्रतिकृतीला माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मा.मोहम्मद शरीफ सर अध्यक्ष पर्यावरण वाहिनी व प्रमुखवक्ते मा.शेख अमजद पापाभाई ,संस्थापक अध्यक्ष हजरत टिपू सुलतान फाउंडेशन विशेष उपस्थिती मा. जुबेर आझाद जिल्हाध्यक्ष टिपू सुलतान विचार मंच
मा.संदीप देव जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी, मा. सत्यभामाताई भाले जिल्हा सल्लागार महिला आघाडी चंद्रपूर, मा.विमलताई ब्राह्मणे, ज्येष्ठ कार्यकर्त्या वंचित बहुजन आघाडी,मा. रोहित चुटे,संभाजी ब्रिगेड मा. रेखाताई पागडे शहराध्यक्षा महिला आघाडी बल्लारपूर मंचावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रमेश नातरगी, गुलाम अहमद, सुनील मांझी,परवेज पठाण, अनुष्का गौतम रामटेके, अनामिका देविदास करमरकर, आयुष भडके या
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला सोबतच सतत 50 तास रांगोळी काढणाऱ्या कुमारी भारती डुंबरे यांचे नाव लिंक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे यांचा देखील सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या सर्वात वयोवृद्ध महिला कार्यकर्त्या विमलताई ब्राह्मणे वय 85 वर्षे आहे यांचा देखील सन्मान करण्यात आला तदोप्रांत
राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रबोधन कार्यक्रमाचे प्रमुखवक्ते शेख अमजद पापाभाई यांनी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा व ऐतिहासिक साम्यतेचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम समाजाच्या सलोख्याचा ऐतिहासिक दाखला देत समुदायाचे मार्गदर्शन केले विशेष करून महाराजांना वाघनख देणारा सुद्धा धर्माने मुस्लिम होता सर्व धर्मीयांना समान न्याय असल्यामुळेच म्हणून महाराज हे रयतेचे राजे होते रयतेच राज्य होतं अशा प्रकारे महाराजांच्या विचारांचा प्रसार या देशाच्या कानाकोपऱ्यात झाला पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली .
अध्यक्षीय भाषण शहराध्यक्षांनी केले तर आभार प्रदर्शन महिला आघाडी अध्यक्षा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले
अशी माहिती एका पत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहर महासचिव यांनी दिली

