मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*कुरखेडा : -* कुरखेडा तालुक्यात येणाऱ्या देऊळगाव येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष संतोष ठलाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन केले. सोबतच साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले व मोलाचे मार्गदर्शन केले. बोलताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करून आचरणात आणणे आजच्या घडीला काळाची गरज आहे. म्हणून तेथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना व विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले.त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित असलेले सत्यभामा ठलाल,तेजस मूर्वतकार, विशाल चंदेल, संतोष ठलाल, संगीता ठलाल तसेच शाळेतील विद्यार्थी व बालगोपाल यांनी महाराजांना अभिवादन केले.

