निर्मला नल्लावार (कोंडबतूलवार) सक्षम नेतृत्वाचा सन्मान, प्रगतिशील वाटचालीचा अभिमान: माजी खासदार अशोक नेते
विश्वनाथ जांभूळकर आलापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- नगर पंचायतच्या बांधकाम सभापतीपदी निर्मला नल्लावार (कोंडबतूलवार) यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी त्यांचे आलापल्ली विश्रामगृह येथे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.
या प्रसंगी जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनंपलीवार, प्रकाश दता, सुनिल बिशवास, मच्छिमार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष मोहन मदने, अहेरी तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजुभाऊ सरकार, सुकमाल हलदार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या गौरव सोहळ्यात निर्मला नल्लावार (कोंडबतूलवार) यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा करताना माजी खासदार अशोक नेते यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

