आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढ झाली आहे. त्यात गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलिस दिवसरात्र जंग जंग पछाडत आहे. अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंड्यावर कारवाई करत बेड्या ठोकल्या जात आहे. त्यात गुलटेकडी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या खबरे वरून गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून पिस्टल व काडतुस जप्त केले आहे. ओंकार बाळु मावास वय 21 वर्ष, रा. गुलटेकडी, डायस प्लॉट, मार्केटयार्ड असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे पोलिस पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना खबर मिळाली की, डायस प्लॉट येथील कॅनॉल जवळ एक तरुण शस्त्र घेऊन थांबलेला आहे. या खबरे वरून पोलीस पथक डायस प्लॉट येथे गेले. त्यांनी संशयित ओंकार मावास याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक पिस्टल व एक जिवंत काडतुस असा 40 हजार 400 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. यावेळी स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, साधना ताम्हाणे, विजय पवार, पुष्पेंद्र चव्हाणव नागनाथ राख यांनी केली आहे.

