अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील गाडगेबाबा वार्ड येथिल शितला माता मंदिराजवळ पोलिसांनी 24 फेब्रुवारीला सायकांळी 6.30 वाजताच्या सुमारास गावठी मोहा दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करीत 35 लिटर गावठी मोहा दारू जप्त केल्याची माहिती आज 25 फेब्रुवारीला पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांना शितला माता मंदिराजवळ अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून 35 लिटर गावठी मोहा दारूसह 5 हजार 200 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यासंबंधी 24 फेब्रुवारीला रात्री 8 वाजता गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.
बोरगाव येथे 10 लिटर गावठी मोहा दारू जप्त.
हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव येथे 24 फेब्रुवारीला रात्री 8.00 वाजताच्या सुमारास अंगणवाडीत बाथरूममध्ये लपवून ठेवली 10 लिटर गावठी मोहा दारू पोलिसांनी जप्त केली.
प्राप्त माहितीनुसार पोलिसांना बोरगाव येथे अवैध दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच याठिकाणी जाऊन पाहणी केली असता अंगणातील बाथरूममध्ये 10 लिटर गावठी मोहा दारू आढळून आली. यावेळी पोलिसांनी दारू जप्त करून यासंबंधी अल्लिपुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास अल्लीपुर करीत आहे.

