Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

60 दिवसानंतर वणा नदीत शुद्ध पाणी जाईल, हिंगणघाट नगर पालिका मुख्याधिकारी यांची लेखी माहिती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 25, 2025
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
60 दिवसानंतर वणा नदीत शुद्ध पाणी जाईल, हिंगणघाट नगर पालिका मुख्याधिकारी यांची  लेखी माहिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिगणघाट:- प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात संगम क्षेत्रात गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाचा अहवाल समोर आले आहेत. त्यावरून एक नवीन वाद सुरू झाला आहे. त्यात हिंगणघाट शहरातून वाहणाऱ्या वणा नदीत सर्रास फीकल कॉलीफॉर्म बॅक्टेरिया युक्त नाल्याचे सांडपाणी सोडण्यात येत असल्याने हिंगणघाट शहरात नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

हिंगणघाट शहरातील आजवर 12 हजार घराच्या सांडपाणी वाहून जाणाऱ्या जोडण्या झालेल्या असून अन्य घरातील जे पाणी वणा नदीत जात आहे त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे पत्रव्यवहार करून त्या कामासाठी लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक निधी आल्यानंतर शासनाच्या निधीतून किंवा नपच्या स्वनिधी मधून सदर काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी एका लेखी पत्रातून शिष्टमंडळाला दिले आहे.

वणा नदीत गावातील दूषित पाणी जात असल्याने नदी प्रदूषित होतं असल्याने वणा नदी संवर्धन समितीने या नाल्यात आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यावर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी दि 24 फेब्रुवारीला या संदर्भात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी रुपेश लाजूरकर, माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, नितीन क्षीरसागर, देवा कुबडे, सतीश धोबे, अशोक मोरे, सूरज कुबडे, वसंत पाल, दीपक जोशी यांनी नगर परिषद प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या प्रदीर्घ चर्चे नंतर या शिष्टमंडळाने नगर परिषद अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी चालण्याचा आग्रह करून या ठिकाणी सदर प्लॅन्ट हा सन 2022 मध्ये आलेल्या पुरामुळे नादुरुस्त झालेला होता. सदर प्लांटची दुरुस्ती 2025 मध्ये झालेली असून आठ दिवसापूर्वी हा प्लॅन्ट सुरु होऊन त्यातून 12 हजार घरातून निघणारे दूषित पाणी या प्लॅन्ट मध्यें येते असून अन्य शहरातील दूषित पाणी हें थेट नदीत जात असल्याचे सिद्ध झाले. या प्लॅन्टची अजूनही बरीचशी किरकोळ कामे बाकी असून ती पूर्ण झाल्या नंतर घाण पाणी शुद्धीकरण प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी एका पत्रकातून कळविले आहे.

सदर प्लॅन्ट हा पूर्ण क्षमतेने चालविण्याकरीता अंदाजित 60 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली असून या साठ दिवसाच्या कालावधीत शहरातील नाल्याचे पाणी शुद्धीकरण करून वणा नदीत सोडण्यात येईल अशी हमी नप मुख्याधिकारी यांनी एका लेखी पत्रकातून दिलेली आहे.

या साऱ्या प्रकरणातून जीवन प्राधिकरण व नप यांच्यात समन्वय असल्याचा अभाव दिसून येत असून हा प्लन्ट पुढील निधी उपलब्ध झाला तरच सुरु होईल अशी लक्षणे दिसून येत असून सद्यस्थितीत नागरिकांना मात्र दूषित पाणी पिणे नशिबात आहे असे दिसत आहे.

या बैठकीला जीवरक्षक राकेश झाडें, वणा नदी संवर्धनचे अशोक मोरे, पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशिष भोयर, अपंग संस्थेचे मारोती महाकळकर, माजी नगरसेवक मनिष देवढे, धनराज कुंभारे, तुषार हवाईकर, उमेश डेकाटे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: 60 दिवसानंतर वणा नदीत शुद्ध पाणी जाईलHinganghat nagar palikaHinganghat wana nadiहिंगणघाट नगर पालिकाहिंगणघाट वणा नदी
Previous Post

भारत vs पाक, नागपुर: भारत मॅच जिंकल्यानंतर फटाके फोडणं पडलं महागात, पोलिसांनी 5 तरुणांवर केली जोरदार कारवाई.

Next Post

हिंगणघाट शहरातील शितला माता मंदिरा जवळ पोलिसांची गावठी मोहा दारू विक्री विरोधात कारवाई, 35 लिटर दारू जप्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट शहरातील शितला माता मंदिरा जवळ पोलिसांची गावठी मोहा दारू विक्री विरोधात कारवाई, 35 लिटर दारू जप्त.

हिंगणघाट शहरातील शितला माता मंदिरा जवळ पोलिसांची गावठी मोहा दारू विक्री विरोधात कारवाई, 35 लिटर दारू जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In