पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेद्वारे आयोजित अकराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सौ पुष्पा तायडे यांची निवड करण्यात आली. साहित्य क्षेत्रात गेली ४० वर्षे त्यांनी योगदान दिलेले आहे. त्यामुळे मराठी साहित्य मंडळाने त्यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड केली.
शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी मा. सुरेश भट साहित्य नगरी जवाहर विद्यार्थी गृह न्यू नंदनवन नागपूर येथे हे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. मराठी साहित्य मंडळाची स्थापना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट यांनी केली आहे. या अकराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ. रेखा जगनाळे मोतेवार या विद्यमान संमेलनाध्यक्षा डॉ. पुष्पा तायडे यांच्याकडे संमेलनाची सूत्रे सोपवतील.
या उद्घाटन सत्रामध्ये सुधाकर अडबाले शिक्षक आमदार महाराष्ट्र राज्य विधान परिषद मोहन मते आमदार नागपूर विभाग महाराष्ट्र राज्य कृष्णाजी खोपडे आमदार पूर्व नागपूर विधानसभा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राला सुपरिचित असलेले मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट, मंगेश घवघवे प्राचार्य, नंदनवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, ललिता गवांदे ज्येष्ठ कवयित्री व राष्ट्रीय उपाध्यक्ष नाशिक, ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित कोल्हापूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय माजी संमेलनाध्यक्ष डॉ विनायक जाधव, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पुणे, प्रियंका ठाकूर सिने नाट्य अभिनेत्री आदी मान्यवर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या साहित्य संमेलनाचे आयोजन डॉ. प्रवीण उपलेंचवर, सिद्धार्थ कुलकर्णी, डॉ. रमनिक लेंगुरे, नीता चिकारे, मनीष उपाध्ये, डॉ रत्नाकर मुळीक यांनी केले आहे. तसेच या साहित्य संमेलनाचे सूत्र संचालन सुप्रसिद्ध निवेदक डॉ. रत्नाकर मुळीक करणार आहेत हे विशेष होय. तरी साहित्यिक, कवी, साहित्याची आवड असणाऱ्या सर्व साहित्य प्रेमींनी ह्या साहित्य संमेलनात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

