नाजुकराव तायडे यांच्या तिन वर्षापासूनच्या लढ्याला यश.
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- बुवा येथील रुग्ण नाजुकराव तायडे यांना दात दुखीचा त्रास असल्यामुळे त्यांनी दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी सर्वोपचार रुग्णालयांमध्ये रितसर चिठ्ठी काढून तपासणी केली. वरीष्ठ निवासी डॉ. संजय शर्मा, यांनी एक्स रे काढायचा सांगितला. तायडे यांनी 130 रुपयाची पावती घेऊन एक्सरे काढून तपासणी करीता ईतर वरिष्ठ डॉक्टरांना दाखविला तर डॉक्टरांनी मी एक्स रे काढायचा नाही सांगितला. ज्यांनी काढायचं सांगितलं त्यांनाच दाखवा नंतर रुग्णाने संजय शर्मा यांच्याकडे एक्स-रे दाखवला त्यांनी मला एक्स-रे मध्ये काही समजत नाही असे स्पष्टपणे सांगितले व रुग्णांसोबत उद्धटपणाची वागणूक व गैरवर्तन केले म्हणून रुग्ण नाजुकराव तायडे यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्याकडे तक्रार दाखल केली.
परंतु अधिष्ठता मीनाक्षी गजभिये या प्रकरणी डॉक्टरला पाठीशी घालण्याचे काम करत होते. म्हणून तायडे यांनी प्रथम दिनांक 09 ऑक्टोबर 2023, द्वितीय 27 ऑक्टोबर 2023 तृतीय 22 नोव्हेंबर 2023 रोजी स्मरणपत्र देऊन डॉ. संजय शर्मा यांच्या वर कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर प्रथम दि. 4 डिसेंबर 2023 रोजी समिती स्थापन करण्यात येऊन चौकशी केली. परंतु तक्रारी मध्ये तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. म्हणुन द्वितीय 20 फेब्रुवारी 2024 रोजी एमएस डॉ. प्रवीण सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली. परत दि. 2 डिसेंबर 2024 रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविण खंडाने यांच्या अध्यक्षतेखाली नाजुकराव तायडे यांनी केलेल्या दंतशास्त्र विभागातील तक्रारीची दखल घेता तक्रारीची चौकशी करण्याकरीता त्रीसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या कार्यालयास प्राप्त झाला असुन त्यामध्ये डॉ. संजय भुपेंद्र शर्मा, वरीष्ठ निवासी हे विभागातील डॉक्टर व अधिकारी यांचेशी गैरवर्तणुक करतात हे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
त्यांनी नाजुकराव तायडे यांचेशी केलेली वर्तणुक सुद्धा आक्षेपार्ह आहे त्यामुळे त्यांच्या तक्रारीची दखल घेवून वरीष्ठ निवासी डॉ. संजय शर्मा यांचे पुढील नियुक्ती आदेश निर्गमीत करण्यात येवू नये असा आदेश डॉ. मिनाक्षी गजभिये अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला यांनी दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी काढला आहे. सदर प्रकरणी रुग्णांला न्याय मिळण्यासाठी व डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी रुग्णांला सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

