अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- धनोजे कुणबी समाज मंडळ सावनेर व धनोजे कुणबी युवा मंच नागपूर( ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपवर वधू परिचय मेळावा,सत्कार समारंभ व स्नेह मिलन सावनेर येथील मधुमालती सभागृहामध्ये २३ फेब्रुवारीला भव्य स्वरूपात पार पडला. यामध्ये १७२ युवक युवतींनी परिचय दिला तसेच उल्लेखनिय कार्याबद्दल २० मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती, रोजगार, कृषी विषयक, महिला बचत गट तसेच इतर खाजगी स्टॉल उपलब्ध कऱण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शंकरराव ढोके यांनी केले तर अध्यक्षस्थान गंगाधरजी माडेकर यांनी भूषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.परेश जवाहरजी पिंगे यांनी केले. यावेळी मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, विवेक मोवाडे, रामभाऊ मुसळे, अँड.गजानन आसोले आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली डहाके, योगिता घोडमारे व प्रतिभा वडस्कर यांनी केले तर युवा मंच तर्फे आभार राहुल सातपुते यांनी मानले. या कार्यक्रमांमध्ये सावनेर येथे भव्य समाज भवन उभारून तेथे विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्याच्या मानस सर्वांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमांमध्ये नागपूर जिल्ह्यातील बहुतांश गावामधिल समाज बांधव भरपूर संख्येत उपस्थित होते. मंडळ तसेच युवा मंचच्या सदस्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अनेक दिवसांपासून अथक परिश्रम घेतले.

