पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मासोद येथील प्राचीन शिव मंदिरात नवनिर्माण बहुद्देशिय संस्थेच्या वतीने महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. भाविकांनी मंदिरात पूजा-अर्चना करुन ‘हर हर महादेव’च्या जयघोषात शिवशंकराचे दर्शन घेतले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष रवी गाडगे व संस्थेचे अध्यक्ष दिलीप नरवडीया, प्रवक्ता मनोज माळवी यांच्या हस्ते शिवभक्तांना साबुदाना खिचडी, फळ, व शितल जल वितरण करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. यशस्वीतेसाठी प्रदीप जेसवानी, अरविंद बागडे, मनोज खंडवानी, देव गाडगे पाटील, निखिल वरखडे, हेमंत उपाध्याय, पंढरी लंबाडे, राकेश कश्यप यांचेसह स्थानिक शिवभक्तांनी सहकार्य केले.

