Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

‘रॉटरडॅम’मध्ये गौरवलेल्या ‘फॉलोअर’ चित्रपटाचा टीजर लाँच, सीमा भागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची गोष्ट.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 28, 2025
in Uncategorized, नागपुर, मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ
0 0
0
‘रॉटरडॅम’मध्ये गौरवलेल्या ‘फॉलोअर’ चित्रपटाचा टीजर लाँच, सीमा भागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची गोष्ट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवलेल्या “फॉलोअर” या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून, मराठी, कन्नडा आणि हिंदी या भाषांचे अनोखे मिश्रण या चित्रपटात आहे.

‘फॉलोअर’ची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स आणि कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र, हर्षद नलावडे हे या चित्रपटाचे निर्माते असून राघवन भारद्वाज, चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन हर्षद नलावडे यांचे असून निभावली असून रघु बसरीमारद, डोना मुन्शी आणि हर्षद नलावडे यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. साकेत ग्यानी यांनी छायाचित्रण, मौलिक शर्मा संकलक, सम्यक सिंग यांनी लिहिलेल्या गीतांना सम्यक सिंग आणि अभिज्ञान अरोरा यांचे संगीत लाभले असून ही गाणी सम्यक सिंग यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

महाराष्ट्राच्या सीमाभागात मराठी, कन्नडा भाषिक वाद आहेत. हा विषय अपवादानंच चित्रपटात हाताळला गेला आहे. चित्रपटाच्या टीजरमधून पत्रकार असलेल्या तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कथा हाताळण्यात आल्याचं दिसतं. या कथेला नातेसंबंध, राजकारण असे पदर असल्याचंही जाणवतं. चित्रपटाचा टीजर पहिल्या फ्रेमपासूनच गुंतवणारा आहे. चित्रपटातील कलाकार नव्या दमाचे असले, तरी रॉटरडॅमसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात दाखवल्या गेलेल्या या चित्रपटातून एक अनोखी गोष्ट मांडण्यात आली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचा टीजर कुतूहल वाढवणारा आहे. आता ‘फॉलोअर’ला चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी फॉलो करावं लागणार आहे.

Tags: 'रॉटरडॅम'मध्ये गौरवलेल्या 'फॉलोअर' चित्रपटाचा टीजर लाँचFollowerFollower marathi movieसीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची गोष्ट.
Previous Post

28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्याने विशेष लेख.

Next Post

मासोद येथील प्राचीन शिव मंदिरात नवनिर्माण बहुद्देशिय संस्थेच्या वतीने महाशिवरात्री उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मासोद येथील प्राचीन शिव मंदिरात नवनिर्माण बहुद्देशिय संस्थेच्या वतीने महाशिवरात्री उत्साहात साजरा.

मासोद येथील प्राचीन शिव मंदिरात नवनिर्माण बहुद्देशिय संस्थेच्या वतीने महाशिवरात्री उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In