प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे-पाटील यांनी कारंजा तालुक्यातील बोरगाव (ढोले) येथील मृतक आत्महत्याग्रस्त शेतकरी रुपचंद नथ्थुजी ढोले यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन केले सात्वन. यावेळी उप विभागीय कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, कृषी अधिकारी रमेश वाघमारे, कृषी पर्यवेक्षक परमेश्वर ढिसले, कृषी सहाय्यक वनिता राठोड, मंडळ अधिकारी श्री राठोड साहेब उपस्थित होते.
निलेश हेलोंडे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी यांचे सात्वन करुन त्यांना शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनेंतर्गत शेती साहित्य, मुलांच्या शिक्षणासाठी सावित्री फुले योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मृतक शेतक-यांकडे कोरडवाहू शेती असल्याने सिंचनासाठी विहिर मंजूर करुन देण्यासोबतच शेती पुरक दुग्ध व्यवसायासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जनावरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही निलेश हेलोंडे यांनी सांगितले.
यावेळी श्री. हेलोंडी पाटील यांनी आर्वी तालुक्यातील मोरांगणा येथील मृतक आत्महत्याग्रस्त शेतकरी पंकज माधवराव डोळे यांच्या कुटूंबियांची सुध्दा भेट घेऊन सात्वन केले.

