मोबाईल तंत्रज्ञान योग्य वापरल्यास मित्र, अन्यथा दुरूपयोग केल्यास शत्रू – मुजावर अली
संतोष मेश्राम,राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा तालुक्यातील १५ कि.मी अंतरावर असलेले पाचगाव हे गाव आदिवासी बहुल असून ९ गुडयांना सोबत घेवून वसलेले आहे. यागावात विविध जातीचे लोक आनंदाने एकत्र राहतात. सुख-दु:खात सहभागी होतात. परंतू सध्याच्या स्मार्ट माबाईलच्या युगात चांगला वापर केल्यास फायदाच होतो पण चुकीचा व अज्ञानापेटी होणारा मोबाईलचा वापर धोकादायक ठरु शकतो. विकसित व आधुनिक तंत्रज्ञानाने अवघड गुन्हे ही शोधण्यात पोलिसांना मदत होते. आपल्याकडे असलेल्या स्मार्ट मोबाइलचा वापर अचूक केल्यास स्पर्धात्मक परीक्षेत यश संपादन करता येते, पण दुरूपयोग केल्यास गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागते. आधूनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून स्वतःची व देशाची प्रगती साधावी असे मौलिक मार्गदर्शन चंद्रपूर हे चंद्रपूरचे सायबर सेलचे प्रमुख मुजावर अली यांनी आपल्या मार्गदर्शना अनेक दाहरणे देवून सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच महिला-मुलींना पॉक्सो कायदा व सायबर क्राईम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले पोलिस मुख्यालयातील सायबर क्राईम कार्यालय संगणक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. मोबाईलचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे करता, इंटरनेटचा किती व कशासाठी वापर करता, त्यात काय बघता हे आम्हाला एका क्लिकवर माहिती मिळते. त्यामुळे युवकांनी मोबाईलचा सदुपयोग करा, मोबाईलमध्ये जास्त गुंतून राहण्यापेक्षा मैदानी खेळाकडे लक्ष देऊन मन व शरीर सुदृढ बनविण्याचा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे आयोजक तथा ग्रा.प.सदस्य बापुराव मडावी यांनी प्रमुख मार्गदर्शक मुजावर अली, पोलिस अंमलदार ललिता शेंडे, जया मेश्राम यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व कार्यक्रमाची रूपरेषा प्रास्ताविकेतून मांडली.
हिरा-मोती कोयतुर बहुउद्देशीय मंडळ पाचगाव च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. अध्यक्षस्थानी सरपंच नामदेव आळे, प्रमुख उपस्थिती पोलिस अंमलदार ललिता शेंडे, जया मेश्राम, पं.स.माजी सदस्य सुनंदा डोंगे, माजी सरपंच शंकर गोनेलवार, पोलीस पाटील शंकर खामनकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश कोहपरे, सेवानिवृत मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, ग्रा.प.सदस्य मनोज कुरवटकर, गुरूदेव सेवा मंडळाचे सुधाकर गेडेकर, लक्ष्मण नुलावार, शाळा व्य. समितीचे अध्यक्ष सत्यपाल चापले यांची उपस्थिती होती. जि.प.शाळेचे शिक्षक जहिर खान,वर्षा चौधरी यांनी मुलांकडून स्वागतगीत व सांस्कृतिक नृत्य सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
संचालन जि.प.शाळेचे शिक्षक सुधाकर कुळसंगे यांनी, आभार माजी सरपंच गोपाल जंबुलवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे शामराव कोटनाके, गुलाब कन्नाके, रूपेश गेडेकर, आकाश नुलावार, रामा आळे, मयुर इरदंडे, निशिकांत भेंडे, युतेश भेंडे, विजय मेश्राम, सोनू सिडाम यांनी सहकार्य केले.

