प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मानव अधिकार सहायता संघाच्या वतीने वर्धा जिल्हा अध्यक्ष विद्या गिरी यांच्या नियोजनात पुण्यात स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षे तरुणीवर शिवशाही बस मध्ये झालेल्या बलात्काराचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी मानव अधिकार सहायता संघाच्या वतीने हिंगणघाट उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले की, दिवसेंदिवस महिलांवरचे अत्याचार वाढतांना दिसत आहे देशातील सवेदनशील असलेल्या पुणे शहरात पुण्यातून 26 वर्षे तरुणी फलटण कडे निघाली होती. नराधम दत्तात्रय गाडे या आरोपीने बस दुसरीकडे लागले म्हणून कोपऱ्यात असलेल्या शिवशाही बस मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. शिवछत्रपती राजांचे नाव असलेल्या बस मध्ये असे प्रकार महिलांवर घडत आहे काय म्हणाव? या महाराष्ट्राला सरकारने कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र या विकृत बुद्धीच्या नरधामला दत्तात्रय गाडे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी हे निवेदन शासनापर्यंत पोहोचण्यात यावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मानव अधिकार सहाय्यता संघाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मानव अधिकार आयोग साहायता संघाचे अनेक महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

