मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
हिंगणघाट शहरात अवैध धंदे, चोऱ्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यावर आळा घालावा अशी विनंती युवकचे प्रदेश सचिव प्रशांत लोनकर यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस हुमायू मिर्झा बेग, युवकचे प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुशील घोडे, जिल्हा महासचिव राजू मुडे, शहराध्यक्ष विपुल थुल, तालुका संघटक वैभव साठोने, तालुका उपाध्यक्ष पंकज भट्ट, शहर उपाध्यक्ष रवी मेसेकर, विपुल वाढई, अभिजित साबळे, मनीष मुडे, निखिल ठाकरे आदी उपस्थित होते.

