संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बुद्धगया येथे सुरू असलेल्या बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राजुरा येथे महाबोधी महाविहार मुक्ती समिती राजुरा च्या नेतृत्वात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून दिनांक ७ मार्च ला धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील विविध धार्मिक स्थळे ही त्या त्या धार्मिक संस्थांच्या ताब्यात देण्यात आलेली असून बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे मात्र अजूनही बौद्धांच्या ताब्यात देण्यात आले नाही. याकरिता गेल्या ५० वर्षापासून भारतातील बौद्ध समाज आणि बौद्ध भिक्षू यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालवलेले आहे . तरीही अजूनही शासनाने सदर महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलेले नाही. ही बाब अत्यंत चुकीची व संपूर्ण भारतातील बौद्धांवर अन्याय करणारी आहे.
सदर महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. या मागणीसाठी भारतातील बौद्ध भिक्षुनी दिनांक १२ फेब्रुवारी पासून बुद्धगया येथे भव्य असे आंदोलन सुरू केले असून बौद्ध भिक्षूंच्या सदर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दिनांक ७ मार्चला बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती समिती राजुरा यांच्या नेतृत्वात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून भव्य धरणे आंदोलन करण्यात येनार आहे . सदर धरणे आंदोलनात बौद्ध उपासक उपासिका आंबेडकरी अनुयायानी ७ मार्च ला राजुरा येथे तहसील कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.