कैलास बोराडे यांच्या पत्नी यांनी लवकरात लवकर आरोपीना पकडून गुन्हा दाखल करून कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली
रविंद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातून संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणारी घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून आहे. धनगर समाजाच्या तरूणास अमानुष मारहाण करून शरिरावर लोखंडी सळईने चटके देण्यात आले. या घटनेचा वंचित बहुजन आघाडीचा वतीने आरोपीवर कारवाई झाली पाहिजे म्हणून निषेध मोर्चा काढण्यात आला.
जालना जिल्हातील भोकरदन तालुक्यात असलेल्या आनवा येथे एका धनगर समाजाच्या कैलास बोराडे या तरूणास अमानुष मारहाण करून शरिरावर लोखंडी सळईने चटके दिले या घटनेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कैलास बोराडे मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली व उपस्थित जिल्हा निरीक्षक जितेंद्र सिरसाठ, मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा अध्यक्ष डेव्हीड घुमारे, जिल्हा महासचिव डॉ. किशोर त्रिभुवन, जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, जिल्हा सचिव देविदास कोळे, रामप्रसाद थोरात, परतूर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे.