संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तेली समाज महिला मंडळ रामपूर, राजुरा तथा संताजी महिला बचत गट यांचे संयुक्त विद्यमाने नगर परिषद राजुरा जवळील हनुमान मंदिर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तेली समाजातील महिलांनी तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत जगनाडे महाराज, माता यमुनाबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विविध सुप्त गुणांचे सादरीकरण करून महिला शक्तीचा जागर केला. अनेक प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्यात आले. यावेळी तेली समाजातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

