अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- भालेराव हायस्कूल सावनेर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च ला महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना नागपूर जिल्हा ग्रामीण च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.गणेश चिखले हे होते तसेच इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सावनेर शहरातील शिक्षण क्षेत्रातील यशस्वी महिला सौ.भारती लोणकर मुख्याध्यापक भालेराव हायस्कूल सावनेर, सौ. बुऱ्हाण मॅडम, मुख्याध्यापक जवाहरलाल नेहरू हायस्कूल सावनेर, सौ.सोनाली वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून सौ.डिंपी बजाज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद महिला आघाडी प्रमुख या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला भालेराव हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व महिला शिक्षकांचे व महिला पालकांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अस्मिता आठवले यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ.सुनिता जुनघरे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूर ग्रामीणचे उपाध्यक्ष श्री.मीनानाथ सातपुते, कार्यवाह श्री घुले सर, तालुका अध्यक्ष श्री बोबडे सर, उपाध्यक्ष श्री पवार सर, शहराध्यक्ष श्री. वानखेडे सर, श्री.वारकर सर, श्री. गोतमारे सर,कु.स्नेहल नागरे यांनी योगदान दिले.

