गुणवंत कांबळे, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भांडुप:- ट्रेनिंग इंस्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलेपमेंट यांच्या विद्यमाने रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झालेल्या ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ५०४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेस मुंबई, महाराष्ट्रासह, देशभरातून ही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक ९ मार्च २०२५ रोजी स्पर्धेतील सहभागी स्पर्धक, उत्तेजनार्थ आणि विजेत्या स्पर्धक, पालक, शिक्षक आणि आयोजक यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री विद्यामंदीर, भांडूप येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मार्गदर्शक विशाल वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक विशेष शाखा मुंबई, राहूल पवार, छाया खोडके तसेच आर्मी रिटायर्ड डी.डी. शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत अभिवादन केले व तद्नंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून पुढील कार्यक्रमास सुरूवात झाली. त्यानंतर पवई चे संविधानप्रेमी सुरेश घोडगे यांनी हस्ताक्षर स्पर्धा पारितोषिक सोहळा संदर्भात विद्यार्थी स्पर्धकांसाठी मनोरंजनात्मक अभिनंदन पर गीत सादर केले. यावेळी विजेत्या स्पर्धकांनी पारितोषिक वितरण सोहळ्याचा आनंद घेत आयोजकांचे कौतुक केले तसेच अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने व देशपातळीवर प्लेटफॉर्म राबवण्याची विनंती केली.
आधुनिक काळात लेखन कलेचा ऱ्हास होत असताना TISD केंद्र हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबवत असल्यामुळे TISD चे मन;पूर्वक अभिनंदन केले आणि आभार मानले. सदर स्पर्धेत मुंबई, ठाणे, बदलापूर, अकोले, संगमनेर, नाशिक, पुणे, अहमदनगर तसेच महाराष्ट्राच्या कानाकोप-या तून प्रतिसाद देत विजेत्या स्पर्धकांनी उपस्थिती दर्शवली. भांडूप विभागातील अमर कोर विद्यालयातील अनेक विद्यार्थी स्पर्धेत विजेते ठरले.
या पारितोषिक वितरण सोहळ्यास विशेष सहभाग व मनोगत व्यक्त केले ते ३ री ते ६ गटातील तृतीय क्रमांकाचे विजेते पृथ्वीराज खेमकर यांचे प्रतिनिधी पोलीस, शिक्षक, तसेच ७ वी १० गटा तील स्वयंम पाटील, खुला गटाचे द्वितीय क्रमांक विजेते वैभवी गावडे, तृतीय क्रमांक विजेते अनिल त्रिभुवन हे संपूर्ण कुटूंबासह आवर्जून उपस्थित राहिले. यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,
सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना उत्साहित तथा प्रोत्साहित करत टीआयएसडी वतीने राबविण्यात येणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच संविधानांच्या उद्दिष्टांप्रति जनजागृती व्हावी या उद्देशाने टीआयएसडी जे काम करत आहे. त्याबाबत TISD च्या संपूर्ण टीम चे विशेष कौतूक केले तसेच – असेच अभिनव उपक्रम नेहमी सुरू रहावे यासाठी सदिच्छा दिल्या. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे, तसेच स्थानिक कार्यकर्ते, संविधानप्रेमी, नागरिक व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलपमेंट च्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली त्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच प्रदीप मुंडे आणि चेतन बनसोडे अल्पोपहार दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
निकाल (Result) पहिला गट ( ३ री ते ६ वी) प्रथम क्रमांक : संचित वसंत ढगे, द्वितीय क्रमांक: सोहम किशोर जाधव, तृतीय क्रमांक: पृथ्वीराज प्रमोद खेमनर
उत्तेजनार्थ पहिला गट: चित्राली उमेश राऊळ, अर्णव राजेंद्र वानखेडे, काव्या प्रवीण कराळे
दुसरा गट ( ७ वी ते १० वी) प्रथम क्रमांक : अपूर्वा रुपेश नलवडे, द्वितीय क्रमांक : साक्षी सचिन वीर, तृतीय क्रमांक : स्वयंम विनय पाटील
उत्तेजनार्थ दुसरा गट: सोहन सदाशिव कुंभार, साक्षी रामचंद्र कवठेकर, राज प्रमोद कांबिरे, आर्यन अधिक मांडवेकर, श्रावणी आनंदराव निकम, आर्या निलेश तेलगे, प्रणय पवनकुमार डवंगे, गौरी दत्तात्रय पवार, अर्जुन पूजा, हर्षद चव्हाण
खुला गट प्रथम क्रमांक : सुभाष बन्सी साळवे, द्वितीय क्रमांक: वैभवी विनित गावडे, तृतीय क्रमांक: अनिल शहादराव त्रिभुवन
उत्तेजनार्थ खुला गट: विक्रम केरू पारखे, निशा श्रीपाल जाधव, भोसले संतोष भगवान, वीणा रुपेश होळकर, सुनिल जुलाल सोनवणे, ममता दिलीप मोरे, धनराज रघुनाथ दुर्योधन, गौतम अशोकजी शेंडे, विनोद गोविंदा सोनुने, अरुण शंकर जाधव, अविराज यशवंत गोरीवले, पूजा हर्षद चव्हाण
या सर्व विजेत्या स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

