महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. ही घटना समोर येताच सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बाप आणि मुलीच्या पवित्र नात्यास काळीमा फासणाऱ्या या घटनेत मुलीस बेदम मारहाण करण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये संशयित आरोपी विरोधात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटीतील 11 वर्षीय पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या महिन्यात बाप आणि मुलगी घरात एकटे असतांना मध्यरात्री संशयित आरोपींने आपल्या मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. यावेळी धमकवल्याने मुलीने नराधाम अत्याचार सहन केला. मात्र पुन्हा 2 मार्च रोजी घरात कुणी नसल्याची संधी साधत नराधम बापाने आपला हेतू साध्य केले.
वारंवार वडिलाकडून होणारा अत्याचार सहन न झाल्याने पीडितेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने मुलीस बेदम मारहाण केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला.मुलीची तक्रार प्राप्त होताच पोलीसांनी त्यास अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.