प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आंजी (मोठी) येते उज्वल प्रभात संघ व सौ. जयश्री सुनील गफाट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन आणि विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित आलेल्या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन माझ्या करण्यात आले तथा जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुनील गफाट भाजपा जिल्हाध्यक्ष वर्धा, राहुल चोपडा भाजपा महामंत्री वर्धा, जयश्री गफाट माजी शिक्षण सभापती वर्धा, किशोर गव्हाळकर, जगदीश संचेरिया ग्रा.पं. माजी सरपंच आंजी(मोठी), दिपक बावणकर तसेच पदाधिकारी व बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

