प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- रस्ते अपघात कमी करण्यासाठी अतुल पन्नासे सामाजिक कार्यकर्ते व सेलू तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमेटी यांनी स्वताच्या खर्चाने दुचाकी चालकांना मोफत हेल्मेटचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. रस्ते अपघातात सर्वाधिक बळी दुचाकी चालकांचे आहेत. त्यामुळे दुचाकी चालकांना आणि त्यांच्या मागे बसलेल्या सह प्रवाशांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहेत. परंतु नागरिक विविध कारणे देत हेल्मेट घालण्यास टाळाटाळ करतात. जगभरातील वाहनांपैकी केवळ एक टक्का वाहने भारतात आहेत, परंतु रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांपैकी ११ टक्के वाहने भारतात आहेत. देशात दर तासाला ५३ रस्ते अपघात होतात आणि दर चार मिनिटाला एक मृत्यू होतो. त्यामुळे हेल्मेट मुळे अनेक वाहनचालकांचे प्राण वाचू शकतात.
महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना अतुल पन्नासे म्हणाले की, दि. 7 मार्च 2025 ला माझा मित्र रोषण शंकरराव गाठे वर्धा येथे मोटर सायकलनी जात असताना त्यांचे गाडी चालवताना संतुलन बिघडले व त्यांची मोटर सायकल रोडच्या डिवायडरला जाऊन आदळली त्यामुळे त्यांच्या ब्रेनला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला म्हणून मला असे वाटले कि यापुढे दुसऱ्या कोणत्याही मित्राचे असे होऊ नये म्हणून मी माझी परिस्थिती नसताना सुद्धा एक छोटासा निर्णय घेतला कि आपण आपल्या मित्रांना हेलिमेट दिले पाहिजेत या पुढे माझ्या कोणत्याही मित्राचे व गावातील लोकांचे असे काही व्हायला नको म्हणून गावातील लोकांना व माझ्या मित्राना व गावातील लोकांना या पासुन प्रेरणा मिळणार आहे कि खरच आपण या पुढे हेल्मेट घालूनच मोटर सायकल चालवली पाहिजेत असे लक्षात येईल.

