प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- काल सकाळी १० वाजताच्या सुमारास आर्वी येथील नेहरू मार्केट परिसरात भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. रवी डेली नीड्स, श्री लक्ष्मी बुक डेपो, सारथी हँडलूम, रजा मेन्स वेअर तसेच ॲड. गुरुनासिंघानी यांचे कार्यालय या प्रतिष्ठानांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र व्यापारी बांधवांसाठी हा मोठा आर्थिक फटका आहे.
या घटनेची माहिती मिळताच तातडीने उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ यांच्याशी संपर्क साधून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आर्वी, आष्टी आणि पुलगाव येथील अग्निशामक दलाच्या धडपडीमुळे आग नियंत्रणात आणण्यात आली.