विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील मौजा कसनसूर येथे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या तर्फे आणि अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या पुढाकाराने डॉ. मिताली आत्राम यांचा उपस्थितीत वैयक्तिक वन हक्क दावेदारींचे मोका पंचनामा करण्यात आले.
वैयक्तिक वन हक्क दावेदारींचे मोका पंचनामा हे वनविभागाचा कर्मचाऱ्याकडून G.P.S. द्वारे मोजणी करून मोका पंचनामा करण्यात आले. तसेच वन हक्क दाव्येदाराना वन हक्क पट्टा मिळवण्यासाठी इतर कागद पात्रांची माहिती देण्यात आला.या वेळी वन हक्क दाव्येदारांचे पंचनामा करताना यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे अहेरी विधान सभा अध्यक्ष – लक्ष्मण येर्रावर, कसनसूर गाव पाटील – रामा गावडे, सुनील मडावी सरपंच कसनसूर,बबिता गावडे माजी.पंचायत समिती सदस्य, व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वन विभागाचे कर्मचारी आणि कसनसूर गावातली नागरिक उपस्थीत होते.

