*कसनसूर आणि वाघेझरी येथे लोकांना विविध दाखल्यांचे तसेच योजनांचे वाटप.
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी.
मो. नं. 9421856931.
*एटापल्ली*- दि.१२/०३/२०२५ रोजी मौजा – कसनसूर तसेच दि.१८/०३/२०२५ रोजी मौजा – वागेझरी स.येथे तालुका प्रशासनाच्या वतीने ” धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ” घेण्यात आले. सदर कार्यक्रम ग्रामपंचायत येथे घेण्यात आले असून कार्यक्रमाची सुरुवात वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर अभियानात मा. श्री. गोयल ( भा.प्र.से. ) सर उपविभागीय अधिकारी एटापल्ली, मा.श्री. गांगुर्डे सर तहसीलदार एटापल्ली, सौ. कमल हेडो सरपंच कसनसूर, श्री. विलास कोंदामी सरपंच वाघेझरी श्री. संदीप जुनघरे मंडळ अधिकारी कसनसूर, श्री. सुनील धकाते ग्रा.पं.सचिव कसनसूर, श्री. एस.एस. खरात ग्रा.पं. सचिव वाघेझरी, तलाठी श्री. व्ही. एस. जल्लेवार, श्री. राकेश कन्नाके, कु.सुकेशनी पेंदाम, श्री. तलांडे, श्री.आत्राम, तसेच विविध विभागातील कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच अभियानामध्ये तहसील कार्यालय एटापल्ली, प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर, CSC सेंटर, आधार सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कसंनसूर आणि वाघेझरी, तहसील कार्यालय एटापल्ली तलाठी वर्ग तसेच पुरवठा विभाग यांचे विविध योजनाचे स्टाल लावून तेथील नागरिकांना आधार अपडेट करणे, नवीन आधार नोंदणी करणे, राशन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र प्रस्ताव तयार करणे, ऍग्रीस्टाग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करणे, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, आरोग्य तपासणी, ७/१२ वाटप, राशन कार्ड KYC करणे असा विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

