विविध क्रीडा स्पर्धेसह होरर डे, फॅशन डे, माय आयडल, मिस म्याच डे मध्ये विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- आदित्य शिक्षण संस्थेच्या बी कॅम्पस मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम तब्बल दहा दिवस उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्कृती कार्यक्रमाबरोबरच वेगवेगळे प्रकारचे डे- होरर डे, फॅशन डे, माय आयडल, मिस म्याच डे, साडी, टाय डे, ट्रॅडिशनल डे चे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धामध्ये कब्बडी, क्रिकेट, गोळा फेक, थाळी फेक, रस्सी खेच, खो खो, हॉलि्बॉल. यामध्ये सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपली चुणूक दाखवली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सी.ए. गिरीश गिल्डा, डॉ. आदिती सारडा (कार्यकारी परिषद अध्यक्षा व. ना. म. कृ. वी. परभणी तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका) यांच्यासह प्राचार्य शाम भुतडा(आदित्य कृषि महाविद्यालय बीड), डॉ. आपेट (आदित्य अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय ,बीड) डॉ. सतीश कचरे (आदित्य कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बीड), डॉ. हिमांशू श्रीवास्तव (आदित्य दंत महाविद्यालय ,बीड) डॉ. विवेक कुलकर्णी (आदित्य आयुर्वेद महाविद्यालय, बीड) डॉ. अमोल सानप, आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालय बीड, डॉ. विकास गर्जे आदित्य नर्सिंग महाविद्यालय बीड बालाजी बहिरवाल आदित्य फिजिओथेरपी महाविद्यालय यांची प्रमुख उपस्थिती होती. हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम 1 मार्च ते 11 मार्च दरम्यान आदित्य शिक्षण संस्था बी कॅम्पस येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सी .ए. गिरीशजी गिल्डा यांच्या हस्ते झाला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वार्षिक स्नेहसंमेलनात आदित्य शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातील तब्बल दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. हा कार्यक्रम संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ.आदित्य सारडा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी सदस्या तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्याम भुतडा आदित्य कृषी महाविद्यालय बीड यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम आदित्य शिक्षण संस्था बीड तत्पर असते. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – आम्रपाली गायकवाड आणि श्रावणी खेरणार यांनी केलं. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आभार प्राचार्य शाम भूतडा यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो
आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आदित्य शिक्षण संस्थेत वार्षिक स्नेहसंमेलन हा एक आगळा वेगळा उत्सव असतो. तब्बल दहा दिवस येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा, विविध डे असा तब्बल दहा दिवस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी एक से बढकर एक कलागुण येथे सादर केले. त्यांच्या कलेला आदित्य शिक्षण संस्थेकडून वेळोवेळी स्टेज उपलब्ध करून दिले जाते.
- डॉ.आदिती सारडा, संचालिका आदित्य शिक्षण संस्था, बीड

