प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- डॉ. आंबेडकर पुतळा परिसराची पालकमंत्र्यां कडून पाहणी. यानंतर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराला भेट दिली व पाहणी केली. आमदार समीर कुणावर यावेळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे 1 कोटी रुपये खर्च करुन सौदर्यीकरण व पुतळा दूरुस्ती बद्दल सुरू असलेल्या कामाविषयी त्यांनी माहीती जाणून घेतली. तसेच परिसरात सौंदर्यकरण व पुतळ्याच्या दुरुस्ती विषयी त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी आवश्यक सूचना केल्या.
1975 साली स्थापित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेबाच्या पुतळयाचे सादर्यीकरण होणे गरजेचे होते यासाठी आमदार समिर कुणावार यांनी विशेष प्रयत्न केला यासाठी श्री. कुणावार यांचे आभार मानुन 1 कोटी रुपये खर्च करुन पुतळा व परिसराचे सौदर्यीकरण करण्यात येणार आहे.

