प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून हिंगणघाट नगर परिषदेस प्राप्त दोन सक्सन-जेट्टी यंत्राचे आज गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित या सोहळ्यास आमदार समीर कुणावार, नगरपरिषद हिंगणघाट मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे ,सतीश अंभोरे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम, प्रशांत धमाणे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, विजय आगलावे आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभिनांतर्गत हिंगणघाट नगर पालिकेला आवश्यकतेच्या दृष्टीने ५ कोटी रुपयांचे सक्सन-जेट्टी यंत्र आणि २ कोटी ७५ लाखांची पाणी पुनर्वापर सक्सन-जेट्टी यंत्र प्राप्त झाली आहेत. या दोन्ही यंत्रांचे यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी लोकार्पण केले. ही वाहने शहरातील मल वाहिन्या, भूमिगत गटार व मल संकलन केंद्राची स्वच्छता करण्यात उपयुक्त ठरणार आहेत.

