संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर / राजुरा:- राजीव गांधी पंचायती राज संघटन व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने धनोजी कुणबी सभागृह राजुरा येथे सर्वोदय संकल्प शिबीर देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेल्या असंख्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू झाले. दिनांक २३ मार्च रोजी शिबिराच्या पहिल्या दिवशी राष्ट्र निर्माण, राष्ट्र निर्माणात संविधानाची भुमिका, आपले योगदान, राजकारण आणि काँग्रेस, सामुहिक चर्चेतून विविध मुद्दय़ांवर विचार मंथन करण्यात आले, पहिल्या दिवसाची सांगता प्रार्थनेने करण्यात आली.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने कुटुंबात, समाजात राहून जनसेवा, देशसेवेला समर्पित जीवन जगून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत निर्माणात योगदान देता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तर शिबिराच्या दुसर्या दिवशी श्रमदान, अनुभव कथन, भारत संघर्ष, समतेसाठी संघर्ष आणि सभाग, पंचायती राजची आवश्यकता, भविष्यासाठी योजना, सामुहिक चर्चा यासह विविध मुद्दय़ांवर विचार मंथन करण्यात येणार आहे.
यावेळी राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे राष्ट्रीय महासचिव दिपकभाई राठोड, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, महाराष्ट्र प्रभारी नारायण सिंग राठोड, राष्ट्रीय महासचिव संजय समर्थ, राष्ट्रीय सचिव गीता कडवे, प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, उपाध्यक्ष मनोज भोयर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदाताई धोबे, प्रदेश महासचिव नंदकिशोर वाढई, जिल्हाध्यक्ष बंडूजी धोतरे, माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, जिल्हाध्यक्ष रवी खापरे (एम. पी), शहराध्यक्ष जयंत घोडे, अँड. अरूण धोटे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार, केशव ठाकरे, उमाकांत धांडे, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, रमाकांत लोधे, उत्तमराव पेचे, प्रमोद चौधरी, मिलिंद भोयर, खेमराज तिडके, गोविंदा उपरे, देविदास सातपुते, निर्मला कुडमेथे, सोनू दिवसे, कुंदा जेनेकर, संध्या चांदेकर, कविता उपरे, पुणम गिरसावळे, इंदूबाई निकोडे, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष उमेश गोणेलवार, सचिन भोयर, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

