अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे ‘जागतिक जल दिन’ निमित्त अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रम अध्यक्षा म्हणून डॉ.सपना जयस्वाल, प्रमुख अतिथी व मार्गदर्शिका प्राध्यापक आचल वैद्य, रासेयो च्या सहकार्यक्रमाधिकारी प्रा. भाग्यश्री साबळे, रासेयो च्या सहकारी प्रा. प्रतिभा दुबे, प्रा. हर्षदा राऊत यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली, पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण या ओळीतून प्रास्ताविकाची सुरुवात प्रा. भाग्यश्री साबळे यांनी केली, या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका प्रा. आचल वैद्य यांनी जलदिनाचे महत्व सांगत जल हे जीवन असून त्याचा उपयोग आपण कसा करायचा यासंबंधी सविस्तर माहिती विद्यार्थिनींना दिली. अध्यक्षीय भाषणातून उपप्राचार्या डॉ. सपना जयस्वाल मॅडम यांनी पाणी वाचवा जीवन वाचवा असे सांगत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन रासेयो ची सी आर कु.प्रिया उरकुडकर यानी तर आभार कु. हर्षदा मोरे या विद्यार्थिनींने मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

