आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथे रस्ता बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदाराचा हलगर्जी कारभारामुळे एका तरुणाचा करुण अंत झाला आहे. कॉन्ट्रॅक्टदाराचा चुकीच्या नियोजनामुळे या तरुणाच्या दुर्दैव मृत्यू झाला ही घटना नवीन बस स्टॉप परिसरात घडली. अंतरिक शैलेश वालदे वय 18 महात्मा फुले वार्ड असे मृत्यूकाचे नाव आहे.
हिंगणघाट बस स्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला तसेच बस स्टैंड वर विकासाचे काम सुरू आहे. या कारणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने प्रशासनाने कॉन्ट्रॅक्ट दाराच्या मदतीने दोरखंड बांधून वाहतूक बंद केली होती. 23 रोजी पहाटेच्या सुमारास अंतरिक हा दुचाकी वरून जात असताना त्याच्या दुचाकीच्या अपघात झाला. यात त्याच्या मृत्यू झाला. कॉन्ट्रॅक्टदाराच्या चुकीच्या नियोजनाचा तो बळी ठरला.
रस्ता अडवण्यासाठी बांधलेला दोरखंडात अडकून पडल्याने तो गंभीर झाला. दोरखंडाला अडकून पडल्याने अपघात झाल्याने त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली व त्याच्या मृत्यू झाला याच्या जबाबदार असल्याने कॉन्ट्रॅक्ट दारावर कारवाई करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबांनी केलेली आहे. विविध ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असताना कॉन्ट्रॅक्टदारांनी याची पुरेशी सुरक्षा केली जात नाही. व त्याच आज एक बळी पडलेला आहे.

