कल्याण कॉलेज आँफ नर्सिंग येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन : प्राचार्या पुष्पा पोडे, डॉ. अशोक जाधव यांचा सत्कार.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित कल्याण कॉलेज आँफ नर्सिंग तथा कल्याण इंस्टिट््युंट आॅफ नर्सिंग एज्युकेशन राजुरा यांचे संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंम्मेलन २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयातील प्रवेशित ए.एन.एम., जी. एन. एम., बी. एस. सी. (नर्सिंग), पोस्ट बी. एस. सी. (नर्सिंग) विद्याथ्र्यांसाठी कॉलेजमध्ये स्नेहपूर्ण वातावरण निर्माण करुन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार (फ्लोरेन्स नाईटेंगल) प्राप्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर च्या प्राचार्या श्रीमती पुष्पा पोडे आणि उपजिल्हा रुग्णालय राजुराचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक जाधव यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाट्य, संगीत, रॅम्पवॉक, विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा तसेच विविध रंगारंग संस्कृतीक कार्यक्रम सादर करून स्वतःतील उत्कृष्ट कलाविष्कार प्रकट केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना तसेच सांस्कृतीक कार्यक्रमातील विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देउन गौरविण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, रुग्ण सेवेचे कार्य हे ईश्वरसेवेचे कार्य असून रूग्णसेवेच्या ईश्वरीय कार्यामुळे नर्सिंग हे सर्वोत्तम क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अशा पवित्र पेशात काम करतांना महाविद्यालयातील शिकवण तसेच मानवतावादी दृष्टीकोन जोपासून प्रगती करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तर श्रीमती पुष्पा पोडे आणि डॉ. अशोक जाधव यांनी आपल्या क्षेत्रातील विविध अनुभव कथन केले व उत्तम ज्ञान आत्मसात करून या क्षेत्राचे नावलौकिक उंचावण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक उपजिल्हा रुग्णालय राजुरा चे वैद्यकिंय अधिक्षक डाॅ. अशोक जाधव, प्रमुख पाहुणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमती पुष्पा पोडे, संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अधिसेविका श्रीमती माया आत्राम, श्रीमती सरला ढोमणे, प्राचार्य संतोष शिंदे, रामेश्वर नागरे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, प्रा. समिर पठाण यासह कल्याण काॅलेज आँफ नर्सिंगचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

