Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुरात भररस्त्यात गोळीबार, एका तरुणाचा मृत्यू तर एक जखमी, घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तणाव.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 4, 2025
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुरात भररस्त्यात गोळीबार, एका तरुणाचा मृत्यू तर एक जखमी, घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तणाव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील मानकापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गोधनी येथील प्रकाशनगर भागात भर भाजीबाजारात चौघांनी शिवीगाळ करीत गोळीबार केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक ग्राहक जखमी झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून आहे. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता व पोलिसांना बंदोबस्त तैनात करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहे.

प्राप्त माहितीनुसार सोहेल असे मृताचे नाव आहे. प्रकाशनगर येथील गोविंद लॉनजवळ ही घटना घडली. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बाजारात चार आरोपी गाडीने आले व त्यांनी तेथील ठेल्यांजवळ गाडी थांबविली. तेथील तरुणांना शाहरूख कुठे आहे असे विचारत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. एकाने देशी पिस्तूल काढत गोळीबारच सुरू केला. त्यातील एक गोळी लागून सोहेल खान वय ३५ वर्ष नावाचा तरुण जखमी झाला. तर भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या मो.सुलतान उर्फ मो.शफी याच्या मानेला चाटून गोळी गेली व तोदेखील जखमी झाला. घटनास्थळावर एक जिवंत काडतूसदेखील आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली व पळापळ झाली.

या घटनेची मानकापूर पोलिस ठाण्याच्या पथकाला याची माहिती देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले व सोहेलला मेयो इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. धीरज घोडमारे, राजेंद्र मरकाम व भूषण अशी आरोपींची नावे आहेत. तर चौथा आरोपी चंदू डोंगरे हा फरार आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी पोहोचले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळावरील तणाव शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

परिसरात तणाव, पोलिसांचा बंदोबस्त
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. काही संतप्त तरुणांनी घोषणाबाजी करत काही दुचाकींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. भाजीचा ठेला लावण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मेयो इस्पितळासमोरदेखील लोक जमले होते व तेथेदेखील तणाव निर्माण झाला होता. तेथे तहसील पोलिस ठाण्यातील पथकाचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Tags: Nagpur breaking newsNagpur crime newsNagpur murderNagpur policeघटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तणाव
Previous Post

हिंगणघाट तालुक्यातील गंगापूर येथील ८२ वर्षीय वृध्द शेतकऱ्याची विहीर उडी घेऊन आत्महत्या.

Next Post

वर्धा नदीवरील रोहिणी घाटावरील पुलाकरिता ३८ कोटी रुपयांचा निधी, आ. समीर कुणावार यांचे पाठपुराव्याचे फलित.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा नदीवरील रोहिणी घाटावरील पुलाकरिता ३८ कोटी रुपयांचा निधी, आ. समीर कुणावार यांचे पाठपुराव्याचे फलित.

वर्धा नदीवरील रोहिणी घाटावरील पुलाकरिता ३८ कोटी रुपयांचा निधी, आ. समीर कुणावार यांचे पाठपुराव्याचे फलित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In