अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांगापुर येथे ८२ वर्षीय वृध्द शेतकऱ्याने सोमवारी रात्री शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत्यक शेतकऱ्याचे नाव नामदेव यादवराव राऊत वय ८२ वर्ष असे आहे.
प्राप्त माहितीनुसार मृत्यक नामदेव राऊत हे सोमवारी सकाळी पोहना येथे नातेवाईकडे जातो असे मुलाला सांगून हिंगणघाट वरुन निघाले. मात्र ते सरळ गांगापुर येथे आले व सकाळी आपल्या शेतात निघून गेले. त्याचे असे बेपत्ता झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता ते मिळून आले नाही. दरम्यान शेतातील विहीरवर नामदेव राउत यांच्या चपला व पिशवी त्यांचा शेतातील गडी याला रात्री आढळून आली.
यासंबंधी त्याने गावात माहिती दिली गावातील नागरीकानी विहिरीत गळ टाकून पाहिले असता मृतदेह आढळून आला. मृत्यदेह बाहेर काढून घटनेची माहिती वडनेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांना माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गौतुरे त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृत्यदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालय हलविला. नामदेव राउत यांनी नेमकी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहे.

