अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-९८२२७२४१३६
सावनेर-०१ ऑक्टोंबर:- सावनेर येथे 26 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सव शहरात मोठ्या उत्साहवर्धक वातावातावरण साजरा करण्यात येत आहे. प्रगती दुर्गा उत्सव मंडळ होळी चौक सावनेरच्या वतीने ३४ वर्ष पूर्ण झालेले आहे.
२६ सप्टेंबरला ढोल ताशा सहित मा वैष्णोदेवी व ज्वाला देवी येथून ज्योती चे आगमन झाले. ज्योतीची मिरवणूक सावनेर कापूस जिनिंग ते प्रगती दुर्गा उत्सव मंडळ होळी चौक पर्यंत काढण्यात आली. गुरुवर्य ह भ प साध्वी सोनाली दीदी करपे अध्यक्ष कल्याण स्वामी संस्था चकलंबा जिल्हा- बीड यांच्या शुभ हस्ते कलश पूजन, ग्रंथपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. घटस्थापना, ग्रंथपूजन व दुर्गामाता मूर्ती स्थापना झाल्यानंतर पूजा-अर्चना करण्यात आली. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये सकाळी काकड आरती व रांगोळी सजावट, श्री दुर्गा सप्तशती मंत्र पाठ आरती, श्रीमद् देवी भागवत पुराण चिंतन, भजन हरिपाठ आरती व प्रसाद वितरण राहील.
२ ऑक्टोंबरला सकाळी ९ वा.गांधी जयंती निमित्त समर्पण फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ऑक्टोंबरला अष्टमी पूजा व हवन पूजा होईल. ४ ऑक्टोंबरला मातीच्या घटाचे विसर्जन होईल. ५ ऑक्टोंबरला विजयादशमी दसरा निमित्य रावण दहनाचा कार्यक्रम व दांडिया चा कार्यक्रम होईल. ६ ऑक्टोंबरला एकादशी निमित्त गुरुवर्य ह भ प श्री वासुदेव जी टापरे महाराज (आळंदीकर) व ह भ प श्री गणेश महाराज बारा मासे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. ७ ऑक्टोंबरला सकाळी ९.३० ते १२ पर्यंत गोपाल काल्याचे किर्तन गुरुवर्य ह.भ.प. श्री. लक्ष्मणजी महाराज नांदेड यांचे गोपाल काल्याचे किर्तन होईल. नंतर लगेच भव्यदिव्य महाप्रसादाला सुरुवात होईल.
श्री नवरात्र महोत्सव कार्यकारी मंडळामध्ये अध्यक्ष- रवींद्र देशमुख, उपाध्यक्ष – तेजरामजी बोरेकर, प्रवीण रासेकर, सचिव – तुषार उमाटे, भूषण कामडी, कोषाध्यक्ष – प्रवीण कराेले, रिंकेश उमाटे, सहसचिव -विलास उमाटे, शेखर वाट, तुळशीराम बनकर, सहकोषाध्यक्ष-हरीश चापेकर, धनराज शास्त्री, तुळशीराम बनकर, विशेष मार्गदर्शन- मदंनजी उमाटे, बाळकृष्णाजी गावंडे ,अशोकभाऊ ऊमाटे,संजय जवाहर, कपिल बोबडे,प्रशांत घोळसे, रितेश बनकर रामाजी वाडबुधे, विनोद घटे, विकी उमाटे, भोजराज सोमकुसरे, गणेश लांडगे उपस्थित होते.

