Sunday, May 18, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संपूर्ण नाशिक जिल्हात खळबळ माजवणाऱ्या व्यावसायिक शिरीश सोनवणे हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 1, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संपूर्ण नाशिक जिल्हात खळबळ माजवणाऱ्या व्यावसायिक शिरीश सोनवणे हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖋️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- संपूर्ण नाशिक जिल्हात खळबळ माजवणाऱ्या शिरीश सोनवणे हत्याकांडात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. व्यवसायाच्या स्पर्धेतून फर्निचर व्यावसायिक शिरीश सोनवणे यांचे अपहरण करत खून करण्यात आला असून खुनाच्या गुन्ह्यातील तिघे संशयितांना नाशिकरोड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली, दरम्यान संशयितांनी खुनाचा गुन्हा कबूल केला आहे. जिल्हा न्यायालयाने ४ ऑक्टोबर पर्यंत संशयित तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे नाशिक शहर पोलिसांनी सांगितले.

एकलहरे रोडवरील स्वस्तिक फर्निचर या कारखान्याचे मालक शिरीश गुलाबराव सोनवणे यांचे ९ सप्टेबर रोजी संध्याकाळी तिघांनी एक हजार बेंच बनवण्याची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने स्वीफ्ट कारमधून अपहरण केले. दुसर्‍या दिवशी मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला होता, ग्रामीण पोलिसांनी तपास करत नाशिकरोड पोलिसांना कळविल्यानंतर मृत सोनवणे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखला. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत करून बेशुद्ध अवस्थेत पाण्यात टाकल्याचा अहवाल आल्याने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांनी तपासाची सूत्र हातात घेतली असली तरी घटनेची सुरुवात नाशिकरोड येथून झालेली असल्याने गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यावर अपहरण करुन खून करण्याच्या घटनेने नाशिक शहर हादरले होते.

नाशिक शहर पोलिसांच्या सर्व गुन्हे शाखेसह नाशिकरोड पोलिसांनी तपास सुरु केला होता. कारखान्यातील कामगार फिरोजसह सर्व कामगार व नातेवाईक यांचे फोन कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. वीस दिवसानंतर सोनवणे यांच्या खूनाचा उलगडा करण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आल्याने पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पथकाचे कौतुक केले. तसेच माहिती देणार्‍या व्यक्तीला रिवार्ड दिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

अशी मिळाली तपासाला दिशा

मयत सोनवणे यांचे कोणतेही वाद, धमकी, खंडणी अशा कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्याने आर्थिक बाजू समजून घेण्यासाठी बँक डिटेल्स मागविण्यात आले. विशेष म्हणजे, सोनवणे यांचा खून झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मयत सोनवणे यांच्या बँक खात्यावरुन दोन हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यावर तांत्रिक मुद्द्यावर तपास सुरु केल्यावर संशयितांनी नाशिकरोड येथील मोबाईल दुकानातून नवीन मोबाईल घेत त्यातून सिडको परिसरात १०० रुपयांची फळे विकत घेतली व दोन हजार रुपये फळ विक्रेत्याच्या मोबाईलवर व्यवहार केला. त्यातून उर्वरीत रक्कम संशयितांनी परत घेतली. तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईल दुकानातील सीसीटीव्ही फूटेज व फोटो पोलिसांनी व्हायरल केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना सोमनाथ कोंडाळकर या संशयिताची माहिती मिळाली. त्याप्रमाणे गुरुवारी दि.२९ संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास अंबड भागातून कोंडाळकर याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांच्या पथकाने चाळीसगाव येथील प्रवीण काळे पाटील याच्या घरी मध्यरात्री सापळा रचून ताब्यात घेतले, प्रवीण पाटील याच्या माहितीनुसार सिडकोच्या विजयनगर भागातून पहाटे तीनच्या सुमारास चालकाला ताब्यात घेतले. तिघा संशयितांनी गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

नाशिक शहर पोलिसांनी दोघांची नावे जाहीर केली. मात्र, कारचालकाच्या नावाबाबत गोपनीयता ठेवली आहे. तिघे संशयित आरोपींना नाशिक शहर पोलिसांनी अटक केली. तरीही, त्यांना मीडियासमोर का आणले नाही, यावर तपासाचा भाग असल्याचे सांगत आयुक्तांनी नकार दिला. संशयित तिसरा राजकीय पदाधिकार्‍याच्या किंवा एखाद्या सरकारी वरिष्ठ अधिकारी कर्मचार्‍याच्या जवळचा असल्याची चर्चा आहे.

व्यवसायाच्या स्पर्धेतून खून

सोमनाथ रामचंद्र कोंडाळकर वय ३६व प्रवीण आनंदा काळे-पाटील २८ या दोघांचा भागीदारीत अंबड परिसरात बेंच व इतर वस्तू बनविण्याचे फेब्रिकेशन व्यवसाय आहे. मात्र, गेल्या ३ महिन्यापासून एकही आर्डर न मिळाल्याने दोघेही आर्थिक विवंचनेत फसले होते. चार महिन्यांपासून वर्कशॉप व राहते घराचे भाडे थकले होते. त्यामुळे मयत सोनवणे यास धमकावून कामाची आर्डर घेण्यासाठी अपहरण केले होते. यावेळी सोनवणे यांनी विरोध केल्याने संशयितांनी खून केला, दरम्यान प्रवीण काळे-पाटील याने चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील बिलाखेड येथील त्याच्या मेव्हण्याकडे जावून मुंबई येथे गणपतीच्या दर्शनाला जायचे आहे असे सांगून त्याची स्वीफ्ट कार आणून कारची नंबरप्लेट बदलून गुन्ह्यात वापरल्याचे पोलिसांनी सांगितले.

असा आहे अपहरण, खूनाचा घटनाक्रम

९ सप्टेंबरला नाशिकरोड येथून सोनवणे यांचे अपहरण झाले.
११ सप्टेंबरला मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
११ सप्टेंबरला संशयितांनी सोनवणेंचे सीम वापरुन आर्थिक व्यवहार केला.
१२ सप्टेंबरला नाशिकरोड पोलिसांकडे गुन्हा वर्ग.
१२ सप्टेंबरला पोलीस आयुक्तालयातील मध्यवर्ती गुन्हे शाखा, गुन्हे शाखा एक व दोन तपासात सक्रिय झाला.
१३ सप्टेंबरला संशयित आरोपी मोबाईल शॉपीमध्ये सीसीटीव्ही फुटेज कैद झाला.
१७ सप्टेंबरला पोलिसांकडून संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करण्यात आले.
२९ सप्टेंबरला नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना संशयिताची माहिती एक जण ताब्यात घेतला.
३० सप्टेंबरला रात्री दीड वाजता चाळीसगाव येथून प्रवीण पाटील यास अटक करण्यात आली.
३० सप्टेंबरला पहाटे ३.३० वाजता सिडको येथून कारचालकाला अटक केली.

Previous Post

सावनेर येथे नवरात्री उत्सव महोत्सवच्या निमित्याने विविध कार्यक्रम आयोजित.

Next Post

Azərbaycanda rəsmi say

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

Azərbaycanda rəsmi say

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In