उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांचे संकल्पनेतुन व त्यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला तर्फे सर्व ऑटो चालक, ऑटो रिक्षा संघटना आणि प्रवाश्यांव्या माहिती साठी कळविण्यात येते की, ऑटो चालक व ईतर प्रवासी वाहन चालक यांनी आपले प्रवासी वाहन चालवितांना गणवेश परिधान करावे. शहरातील सार्वजनीक वाहतुकीस शिस्तबध्द व सुरक्षित बनविण्याच्या उद्देशाने सर्व ऑटो चालकांनी सेवा देतांना अधिकृत गणवेश परिधान करणे बंधनकारक असुन मोटार वाहन कायदा कलम २० (१) (Viii)/१७७ प्रमाणे आवश्यक आहे.
गणवेश परिधान केल्याने प्रवाशांना विश्वासार्हता मिळते तसेच शिस्त आणि स्वच्छतेला प्रोत्साहन मिळते. सर्व ऑटोचालकांनी व प्रवासी वाहतुक करणारे वाहन चालकांनी याबाबत सहकार्य करावे अन्यथा दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी पासुन संपुर्ण अकोला जिल्हयात प्रवासी वाहन चालविणारे चलकांनी गणवेश परिधान न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे तरी सर्व ऑटो बालक व इतर प्रवासी वाहन चालक यांनी याबाबत दक्षता घ्यावी.
ऑटो चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे व सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोला जिल्हयातील नागरीकांना केले आहे.

