आमदार समीर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील समुद्रपूर नगर पंचायत येथील शिवसेना (उबाठा) गटाचे नगरसेवक बाबाराव थुटे यांनी विधानसभा क्षेत्रातील आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आमदार समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. १२ एप्रिल २०२५ रोजी आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला आमदार समीरभाऊ कुणावार यांचे सह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, भाजपा विधानसभा प्रमुख संजय डेहणे, रवी लढी, भाजपा हिंगणघाट तालुकाध्यक्ष ग्रामीण विनोद विटाळे, भाजपा हिंगणघाट शहर अध्यक्ष भूषण पिसे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.